Advertisement

वाळूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला 

प्रजापत्र | Thursday, 09/04/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.९(प्रतिनिधी): तालुक्यातील नवगण राजुरी शिवारात एका टेम्पोच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला मिळताच बुधवार (दि.८) रोजी कारवाई करत ५,१६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकाविरुद्ध बीड ग्रामीण (Police)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
    बीड (Beed) जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा सपाटा सुरु असून बीड तालुक्यातील नवगण राजुरी शिवारात एका टेम्पोमधून अवैध वाळुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सय्यद अशफाक सय्यद अन्सार यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाळूची वाहतूक करताना जावेद रफीक सय्यद (वय ३८)रा. बालेपीर, बीड याच्यावर बुधवार (दि.८) रोजी कारवाई केली.यात टाटा कंपनीचा ७०९ मॉडेलचा टेम्पो पासींग क्रमांक एम.एच.१२. जी.टी.९६६४ अंदाजे किंमत ५,००,००० रुपये व त्यामध्ये दोन ब्रास वाळू अंदाजे किंमत १६,००० असा असा एकूण ५,१६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालकाविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास(Police) पो.ह.पठाण हे पोलीस करत आहेत.

 

Advertisement

Advertisement