Advertisement

एसीबीची सिरसाळ्यात कारवाई 

प्रजापत्र | Tuesday, 31/03/2026
बातमी शेअर करा

बीड दि.३१(प्रतिनिधी)-लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने सिरसाळ्यात सापळा रचून एका पोलीस हवालदाराला उसाची गाडी सोडण्यासाठी दोन हजारांची लाच मागितल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.बीड जिल्ह्यात पोलीस दलात लाचखोरांच्या वाढत्या संख्येमुळे पोलीस अधिक्षकांच्या शिस्तप्रिय प्रतिमेला तडे गेले आहेत.
    दत्ता निगुल असे लाचखोर पोलीस कर्मचाराचे नाव असून उसाच्या गाडी सोडण्यासाठी आधी लाचखोराने एक हजार रुपये स्वीकारले होते. नंतर दोन हजारांची मागणी तक्रारदारकडे करण्यात आली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत निगुलला ताब्यात घेतले आहे. सोपान चित्तमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या एसीबीने ही कारवाई केली असून बीड जिल्ह्यात पोलीस दलात वाढती लाचखोरी यामुळे चर्चेत आली आहे. नवनीत कॉवत यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरीही पोलीस दलात घडत असलेले प्रकार घटकप्रमुख यांची मान खाली घालणारे ठरत आहेत.

Advertisement

Advertisement