Advertisement

१६ वर्षीय मुलीवर अत्याचार

प्रजापत्र | Saturday, 14/03/2026
बातमी शेअर करा

 परळी दि.१४ (प्रतिनिधी): तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पीडित मुलगी ही अवघी १६ वर्षांची असून आरोपींनी तिला गोड बोलून आपल्या घरी बोलावले होते. मुलगी घरात येताच नराधमांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर एका आरोपीने पीडितेचे हात-पाय घट्ट बांधले आणि ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबत आरोपींनी तिच्यावर अतिशय क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला.एवढ्यावरच न थांबता, या नराधमांनी पीडितेची सुटका करताना तिला धमकी सुद्धा दिली. आरोपींनी धमकावत म्हटलं की, हा प्रकार जर कोणाला सांगितला, तर तुला जीवे मारून टाकू. या धमकीमुळे दहशतीखाली असलेल्या मुलीने कशीबशी आपली सुटका करुन घर गाठले. तसेच घरी पोहोचल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64, 127(2), 351( 2), 352, 3(5) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) 2012 च्या कलम 4 आणि 17 नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 125 / 2026 दाखल केला आहे. अंबाजोगाई उपविभागाचे पिंक पथक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सद्यस्थितीत दोन्ही नराधम फरार असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

 

Advertisement

Advertisement