बीड दि.३(प्रतिनिधी) : जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी दीड महिन्यांपूर्वी मांजरसुंबा महामार्गावर कपिलधारवाडी परिसरात जीवन संपवले होते.याप्रकरणी जीएसटी अधिकारी प्रदीप फाटे यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात जीवन संपवण्यास कारणीभूत प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.अखेर स्थानिक गुन्हे शाखेने पुण्याच्या वाघोलीमधून आरोपीला थोडयावेळापूर्वी ताब्यात घेतले आहे.
प्रदीप फाटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला तरीही फाटे पोलिसांना सापडत का नाही असा प्रश्न उपस्थित करत फरार अधिकारी प्रदीप फाटेला अटक करावी या मागणीसाठी मयत सचिन जाधवर यांचे कुटुंब बुधवारी (दि.२५) बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.प्रदीप फाटेच्या अटकेसाठी दबाव निर्माण झाल्यानंतर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला वाघोलीमधून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महेश विघ्ने, अशोक दुबाले यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्यातील सपोनि बाळराजे दराडे यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

