आष्टी दि.१२ (प्रतिनिधी):तालुक्यातील जामगाव येथे ट्रकच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच रविवार (दि.११) रोजी कारवाई करत १५,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकाविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed) जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा सपाटा सुरु असून आष्टी तालुक्यातील खडकत ते जामगाव रोडवर ट्रकच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक करताना सतीश नवनाथ कसबे (वय २५) रा.खडकत ता.आष्टी.जि.बीड याच्यावर रविवार (दि.११) रोजी सकाळी कारवाई केली.यात टाटा कंपनीचा सहा टायर ट्रक क्रमांक एम एच १६ क्यु ६७९७ अंदाजे किंमत १५,००,००० रुपये व त्यामध्ये तीन ब्रास वाळू अंदाजे किंमत १५,००० रुपये असा एकूण १५,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा
