परळी दि.२० (प्रतिनिधी) संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्याा दारू साठवणूक करून ती विक्रीसाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळताच कारवाई करत एकूण २,४८,४३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला केला असून आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी वैजनाथ येथील हॉटेल आबासाहेब समोरील पत्र्याच्या शेडमध्ये ईश्वर रेशमाजी बहीरे (वय ३५) रा. कन्हेरवाडी ता.परळी जि.बीड हा बेकायदेशीररीत्या विविध कंपन्यांची दारू साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप उत्तमराव चव्हाण यांनी पथकासह छापा टाकून शुक्रवार (दि.१९) रोजी रात्री कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांच्या दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले असून यात एकूण २,४७,४३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे संभाजीनगर येथे शनिवारी (दि.२०) रोजी सकाळी १०.३४ वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

