Advertisement

जिल्हापरिषद निवडणुका कधी ? 

प्रजापत्र | Monday, 15/12/2025
बातमी शेअर करा

 

 मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली असून यात राज्यातील २९ महानगरपालिकाच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून जिल्हापरिषद निवडणुकांचा निर्णय मात्र लांबणीवर पडलेला आहे. राज्यातील महानगरपालिकांसाठी  १५ जानेवारी    रोजी मतदान होणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने अखेर महानगरपालिकांच्या निवडणूक अगोदर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , लातूर , परभणी आणि नवनिर्मित जालना महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. त्यासोबतच राज्यातील मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुका देखील जाहीर झाल्या आहेत.
आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्यास   २३ डिसेंबर  पासून सुरुवात होणार असून ३० डिसेंबर  पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. छाननी ३१ डिसेंबर , माघार २ जानेवारी  रोजी पर्यंत घेता येणार असून प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारी रोजी तर मतमोजणी १६  रोजी होणार आहे.

Advertisement

Advertisement