Advertisement

 धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री सरनाईकांकडून १०१ देशी गाईंचे वितरण

प्रजापत्र | Monday, 15/12/2025
बातमी शेअर करा

धाराशिव दि.१५(प्रतिनिधी): अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण उजळला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून त्याच्या वतीने स्वखर्चातून तब्बल १०१ उत्तम प्रतीच्या दे-शी गाईंचे वितरण रविवारी (दि.१४) सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या आहेत.

    अवकाळी पावसाच्या तडाख्याने धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाले. शेतीसोबतच कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा मुख्य आधार असलेली दूधदुभती जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली.परिणामी, शेतकऱ्यांचे जीवनचक्र ठप्प झाले. ही वेदना लक्षात घेवून पालकमंत्री सरनाईक यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. संपूर्ण देशभरातून चांगल्या प्रतीच्या देशी गाई शोधून, त्यापैकी गुजरात येथील गीर प्रजातीची गाय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहोत. या गाईची किंमत ७५ ते ८० हजार रुपये इतकी आहे.विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील स्थानिक देशी गाईंपेक्षा हिचे दूध उत्पादन दुप्पट आहे. सध्या दे-शी गायींच्या दुधाला सरासरी ८० रुपये इतका दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देखील यातूनच चांगले मिळणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार प्राप्त होणार आहे. सरनाईक यांच्यामुळे कळंब, भूम तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फट-का बसल्याने शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा आहे. ही केवळ गाईंची भेट नाही, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा दूधाळ आशा, आत्मविश्वास आणि स्वाभिमान परत आणणारी मायेची हमी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप आणि परंडा सरनाईक यांनी केले आहे.
 

Advertisement

Advertisement