नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला (Tapovan Tree Cutting) राष्ट्रीय हरित लवादाकडून १५ जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती अंतरिम आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडी थांबविण्याचा आदेश देण्यात आला आहे. वकील श्रीराम पिंगळे यांनी सांगितले की, हरित लवादामधे नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. हरित लवादाने तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत स्थगिती दिलीय. हा अंतिम आदेश नाही तर अंतरिम आदेश आहे. तपोवनातील झाडे तोडण्याआधी न्यायिक प्रक्रिया राबवायला हवी, असं आमचं मत आहे. ती न राबवताच वृक्षतोड केली जात आहे. एकदा तोडलेल्या वृक्षांचं पुनर्रोपण नीट केलं जातं नाही, हा अनुभव आहे. यावर्षी झालेल्या कुंभमेळ्यात उभारण्यात आलेल्या एक्झिबिशन सेंटरचा काहीही उपयोग झाला नाही. वृक्षतोडीला आमचा विरोध आहे, असे त्यांनी म्हटले आहे

बातमी शेअर करा
