Advertisement

मुंबईत भीम अनुयायांना मोठं यश

प्रजापत्र | Saturday, 06/12/2025
बातमी शेअर करा

मुंबई : गेल्या साडेतीन तासांपासून चुनाभट्टीजवळ पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चुनाभट्टी-सायन कनेक्टरजवळ भीम अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांकडून भीम अनुयायांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण भीम अनुयायी आपल्या भूमिकेवर ठाम होते. आपल्या रिक्षांना इथून सोडण्यात यावं आणि दादरच्या दिशेला जावू द्यावे, या मागणीसाठी भीम अनुयायी आग्रही होते. या मागणीसाठी भीम अनुयायांनी जवळपास तीन तासांपेक्षा जास्त वेळ आंदोलन केलं. त्यांच्या या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. त्यामुळे साडेतीन तासांपासूनची वाहतूक कोंडी अखेर फुटली आहे. आता चुनाभट्टीच्या पुढे भीम अनुयायांच्या रिक्षा आणि दुचाकींनादेखील सोडण्यात आलं आहे. पोलिसांकडून ही परवानगी मिळाल्याने भीम अनुयायांकडून जल्लोष करण्यात आला. तसेच पोलिसांचे धन्यवाद देखील मानण्यात आले.

    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल होत आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे अनुयायी विविध वाहनांमधून दादर येथील चैत्यभूमी येथे पोहोचत आहेत. काही जण बसमधून, काही जण त्यांच्या चारचाकी वाहनांमधून तर काही जण इतर वाहनांनी मुंबईत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत.

Advertisement

Advertisement