Advertisement

वाळूची चोरटी वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला 

प्रजापत्र | Friday, 05/12/2025
बातमी शेअर करा

पाटोदा दि.५ (प्रतिनिधी): शहरातील घुमरा पारगावकडे जाणाऱ्या रोडवरील विठ्ठल मंदिराजवळ अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गुरुवार (दि.४) रोजी कारवाई करत ६,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरु असून पाटोदा शहरातील विठ्ठल मंदिराजवळ अवैध वाळूची वाहतूक करणारा कल्याण ज्ञानोबा ढेरे (वय ३१) रा.नफरवाडी ता.पाटोदा जि.बीड याच्यावर गुरुवार (दि.४) रोजी कारवाई केली. यात स्वराज ७४४ एफ इ कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्र.एमएच २३ बीसी ३२७४ अंदाजे किंमत ५,००,००० रुपये व  एक विना नंबरची ट्रॉली अंदाजे किंमत १,००,००० रुपये  व ट्रॉलीमध्ये  एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ३,००० रुपये असा एकूण ६,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोउपनि पवार हे करत आहेत.  

Advertisement

Advertisement