Advertisement

 पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारातच कारचा अपघात 

प्रजापत्र | Monday, 10/11/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१० (प्रतिनिधी):शहरातून (Beed) जाणाऱ्या बार्शी रोडवर पोलीस अधीक्षक (Sp office)कार्यालयाच्या दारातच सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ०८:३० च्या सुमारास कारचा अपघात झाला. 
    बीड (Beed) शहरातून जाणाऱ्या नांदेड ते आहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाचे व नालीचे काम गेल्या दोन वर्ष्यापासून धिम्या गतीने सुरु आहे.(Barshi)बार्शी रोडकडे जात असलेल्या कारचा (एमएच.२३बीसी.५८२२) आज (Accident) सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ०८:३० च्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारातच अपघात झाला.या कारमध्ये एक दांपत्य होते त्यांना किरकोळ मार लागला असून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  

 

Advertisement

Advertisement