शिरूर दि.२१ (प्रतिनिधी):तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी आणि पुणे येथे एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले सचिन जायभाये यांनी पालात राहणाऱ्या भटक्या जाती जमाती मधील ४० कुटूंबांना किराणा किट वाटप करून दिवाळी साजरा केली.
आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांच्या घरात दिवाळीचा दिवा लागत नाही किंवा गोड पदार्थ तयार होत नाहीत अशा गोरगरीब कुटुंबीयांसोबत पुण्याच्या प्राध्यापकाने दिवाळी साजरी केली आहे.तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी आणि पुणे येथे एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले सचिन जायभाये यांनी पालात राहणाऱ्या भटक्या जाती जमातीतील ४० कुटूंबांना किराणा किट वाटप करून दिवाळी साजरा करण्याचा निर्णय घेतला.ज्या लोकांचा संपूर्ण संसार हा रस्त्यावर आहे आणि भंगार,प्लास्टिक गोळा करून जे आपले उपजीविका भागवतात अशा खऱ्या अर्थाने गरजू लोकांना किराणा साहित्य दिले आहे.या वेळी उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा,भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश उगलमुगले,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोकुळ पवार,नगरसेवक अमोल चव्हाण,भीमराव गायकवाड,सचिन केदार, संजय आघाव,अनिल जाधव,प्रताप कातखडे,बाळकृष्ण जायभाये,बाळू बडे,राजकुमार पालवे,विनोद बारगजे,अक्षय खेडकर आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.