Advertisement

चोरट्यांनी दोन म्हशी पळवल्या 

प्रजापत्र | Monday, 20/10/2025
बातमी शेअर करा

 शिरूर कासार दि.२० (प्रतिनिधी): तालुक्यातील Crime)तींतरवणी येथील शेतकऱ्याच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार (दि.१९)रोजी सकाळी ६ च्या सुमारास घडली असून चकलांबा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     बीड (Beed)जिल्हयात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून चोरट्यांनी आपला मोर्चा आता जनावरे चोरींकडे वळवला आहे.(Shirur Kasar)शिरूर कासार तालुक्यातील तींतरवणी येथील नारायण पंढरी कापरे (वय ५२) व अन्य एकाच्या घरासोर बांधलेल्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार (दि.१९)रोजी सकाळी ६ च्या सुमारास घडली असून एका म्हशीची किंमत ५०,००० रुपये व दुसऱ्या म्हशीची किंमत ६०,००० रुपये एकूण १,१०,००० रुपयांच्या म्हशी लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement