परळी दि.१८ (प्रतिनिधी):जिल्हयामध्ये झालेल्या पावसाने नद्या नाले ओसंडून वाहू लागले असून परळी तालुक्यातील कौडगाव येथील पुलावरील पाण्याच्या अंदाज न आल्याने चारचाकीसह चार युवक पुराच्या पाण्यात वाहून गेले असता तीन युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून एक जण बेपत्ता आहे .
परळी तालुक्यातील कौडगाव येथे रविवार (दि.१७) रोजी रात्री उशिरा पाण्यात वाहून गेलेल्या चार तरुणांपैकी तीन तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, बल्लाळ नावाचा एक तरुण अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अमर पौळ या तरुणाला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर राहुल पौळ आणि नवले यांनाही प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुखरूप वाचवण्यात आले. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक व नागरिकांचा सक्रिय सहभाग आहे . सध्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे शोधमोहीमेस अडथळे येत असून, बल्लाळ याचा ठावठिकाणा लागलेला नसून त्याचा शोध घेण्याचा प्रयन्त प्रशासनाकडून सुरु आहे.