Advertisement

पीएम किसानच्या हप्त्यासाठी फार्मर आयडीची नाही सक्ती

प्रजापत्र | Thursday, 31/07/2025
बातमी शेअर करा

बीड दि.३१ (प्रतिनिधी): पीएम(Pm kisan) किसान योजनेचा विसावा हप्ता कधी पडेल या कडे देशभरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून होते.  शनिवार (दि.२) ऑगस्ट रोजी हप्ता पडणार असून त्यासाठी फार्मर आयडीची सक्ती राहणार नाही. राज्यभरातील ९२ लाख शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. (Beed)बीड जिल्ह्यातीलही हजारो शेतकर्‍यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग होणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm modi) यांनी २०१९  साली पीएमकिसान योजना सुरू केली. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्षाला टप्प्याने सहा हजार रूपये पडतात. १९ वा हप्ता वर्ग झाल्यानंतर विसवा हप्ता कधी पडतो याकडे देशभरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून होते. हप्ता टाकण्याची तारीख ठरली. शनिवार (दि.२)  ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथील एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत. राज्यभरातील ९२ लाख शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. शेतकर्‍यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी सक्तीची करण्यात आली असली तरी या हप्त्यासाठी तरी फार्मर आयडीची सक्ती करण्यात आलेली नाही.
 

Advertisement

Advertisement