बीड-येथील कोचिंग क्लासेसमधील मोठे नाव म्हणून मिरविणाऱ्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील दोघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) रात्री गुन्हा दाखल झाला होता.विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी आरोपींची नावे असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.मात्र आज सकाळी उमाकिरण बंद ठेवण्यात आले असून पालक आणि विद्यार्थी यांनी परिसरात गर्दी केली होती.यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांचा तगडा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यावरुन शिवाजीनगर पोलीसांनी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांच्या विरोधात पोक्सोखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विजय पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. विजय पवार हे बीडच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळातले चर्चित नाव आहे.रात्री उशिरा दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
आरोपीच्या अटकेसाठी तीन पथके रवाना
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपीच्या अटकेसाठी तीन पथके शोधार्थ रवाना झाली आहेत.आरोपींचा कसून शोध घेणे सुरु झाले असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल असे बीड पोलिसांच्या वतीने सांगण्यात येते.