कडा दि.२३ (वार्ताहर): बीड-अहिल्यानगर (Beed)राज्य महामार्गावरील धामणगांव येथील पाथर्डी चौकात विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक टिप्परच्या साहाय्याने होत असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना मिळताच रविवार (दि.२२) रोजी रात्रीच्या सुमारास (Crime)कारवाई करत १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आष्टी(Ashti) तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील धामणगांव येथील पाथर्डी चौकातरविवार (दि.२२) रोजी रात्रीच्या सुमारास वाळूने भरलेला टिप्पर असल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना मिळताच सापळा रचून कलम ३०३ (२) नुसार पोलीस अंमलदार बालाजी होळंबे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास नाना बोरूडे ता.पाथर्डी याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करून १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त (Crime)केला आहे.हि कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलीस अमलदार शिवदास केदार, बालाजी होळंबे, चालक पठाण यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे हे करीत आहेत.