बीड दि.२१ (प्रतिनिधी ):बीड शहरातील संभाजीनगर मधून दुचाकी चोरी प्रकरणातील संशयित आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवार (दि.२०) रोजी कारवाई केली यावेळी आरोपीकडून पाच दुचाक्या जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव भगवान दळवे (वय ५४) रा.बालेपीर बीड यांच्या घरासमोरुन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी हॅन्डल लॉक तोडुन चोरुन नेली आहे. या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरु केले व शुक्रवार (दि.२०) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, हा गुन्हा अतुल विक्रम वाघमारे याने केला आहे . आरोपी अतुल विक्रम वाघमारे हा संभाजीनगर, बीड येथील किरायच्या राहत्या घरा जवळ थांबला आहे. या माहीती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कारवाई करत. त्याच्या ताब्यातुन वेगवेगळ्या कंपणीच्या पाच दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर दुचाक्या बाबत विचारणा केली असता सदरील दुचाक्या हया बीड परीसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरल्या
आहेत.असे आरोपीने सांगीतले त्यापैकी होंडा कंपणीची शाईन दुचाकीची खात्री केली असता, ही दुचाकी पोलीस ठाणे शिवाजीनगार गुर.नं 341/2025 कलम 303(2) बी.एन.एस मधील असल्याची खात्री झाली. आरोपीने एकुण पाच दुचाक्या चोरल्याचे कबुल केले. आरोपी व पाच दुचाकी पुढील तपासकामी पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या ताब्यात दिल्या आहेत. आरोपी अतुल विक्रम वाघमारे याच्यावर दरोड्यासारखे बरेच गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अभिलेखावरुन दिसुन आले.
ही कारवाई नवनित काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक, बीड, शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारोती कांबळे, विकास राठोड, भागवत शेलार, दिपक खांडेकर, आशपाक शेख, चालक संजय जायभाये यांनी केली आहे