बीड दि.१९(प्रतिनिधी): पोलीस (Beed)अधिक्षकांची 'शॅडो' समजल्या जाणार्या एलसीबीतील रिक्त झालेल्या कर्मचार्यांच्या नियूक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला. स्थानिक गुन्हा (Lcb)शाखेत ९ जणांना तर बीडीडीएसमध्ये चार जणांना नियूक्त्या देण्यात आल्या असून एसपींनी या अंमलदारांची यादी जाहीर केली आहे.
या तेराजणांमध्ये बीड (Beed)ग्रामीणचे अंकुश वरपे, बीड शहरचे मनोज परजणे, पेठ बीडचे अशफाक अन्सार सय्यद, तलवाड्याचे आनंद विष्णू मस्के, केज एसडीपीओ वरून दिलीप चंद्रभान गिते, पिंपळनेरवरून गोविंद धर्मा राख, सिरसाळ्यावरून रामचंद्र परशूराम केकाण, बर्दापूरवरून गोविंद व्यंकटी भताने, एडिशन एसपी बीड यांच्याकडील बबन झुंबर सलगर स्थानिक गुन्हा शाखेत आले आहेत. तर सचिन भीमराव साळवे बीड ग्रामीण वरून बीडीडीएस, अंमळनेरवरून अशोक सुभाष मंत्रे बीडीडीएस, डीबीडीएस वरून विकास कचरू माळी तर पाटोदावरून बळीराम उत्तमराव भोसले बीडीडीएसला आले आहेत. नऊ जणांना एलसीबीत तर चार जणांना (Beed police)बीडीडीएसमध्ये पोलीस अधिक्षकांनी काम करण्याच्या संधी दिल्या आहेत.

बातमी शेअर करा