बीड: राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी अखेर सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार बीड जिल्हापरिषदेत ६१ गट राहणार आहेत. त्यामुळे११ पंचायत समित्यांमध्ये १२२ गण राहणार आहेत. धाराशिव जिल्हापरिषदेत ५५ तर लातूर जिल्हापरिषदेत ५९ गट असणार आहेत.
जिल्हापरिषद निवडणूकीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २०१७ ची स्थिती लक्षात घेऊन जिल्हयाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रभागरचना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातील गट
आष्टी: ७, पाटोदा :३, शिरुरकासार :४, गेवराई: ९, माजलगाव: ६, वडवणी: २, बीड :८, केज : ७, धारुर : ३, परळी : ६, अंबाजोगाई: ६
असा असेल कालबद्ध कार्यक्रम
प्रारुप प्रभागरचना: १४ जुलै पर्यंत
हरकती व सुचना : २१ जुलै
हरकतींवर आयुक्तांकडे प्रस्ताव : २८ जुलै
हरकतींवर सुनावणी : ११ ऑगस्ट
अंतीम प्रभागरचना आयोगाकडे पाठविणे : १८ ऑगस्ट