Advertisement

नगरपालिकांच्या प्रभाग रचनेसाठी  काय आहे डेडलाईन ?

प्रजापत्र | Thursday, 12/06/2025
बातमी शेअर करा

 बीड  : राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोग आणि नगरविकास विभाग सक्रिय झाला असून आता नगरपालिका, तसेच महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेच्या संदर्भाने सरकारने  डेडलाईन जाहीर केली आहे.
राज्यातील निवडणुकांना सामोरे जावे लागणार असलेल्या नगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. आता त्याचा कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. त्यानुसार
प्रगणक गटाची मांडणी : ११ ते १६ जून
प्रारूप प्रभाग रचना १७ जून ते ३ जुलै
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव आयोगास पाठविणे : ८ जुलै
प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती : १५ ते २१ जुलै
जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी : २२ ते ३१ जुलै
अंतिम प्रभाग रचनेस आयोगाची मान्यता : १ ते ७ ऑगस्ट
अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना  : २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
असा कार्यकर्त्म जाहीर करण्यात आला आहे. 

 

Advertisement

Advertisement