Advertisement

शिक्षकाचे फोडले घर 

प्रजापत्र | Thursday, 05/06/2025
बातमी शेअर करा

  बीड दि.५(प्रतिनिधी):शहरातील (Beed)शिवाजी धांडे नगर येथील शिक्षकाच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरटयांनी तोडून कपाटातील सोन्याचे दागिने साहित्य असा एकूण  ७४,०८६ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना (दि.३) मंगळवार रोजी सकाळी १० च्या दरम्यान(Crime) घडली. 

     शहरातील शरद सूर्यकांत पवार (वय ४४) व्यवसाय शिक्षक रा.शिवाजी धांडे(Beed) नगर यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरटयांनी तोडून कपाटातील १४ ग्रॅम वजनाचे गळ्यातील पेंडॉल ,५ ग्रॅमची सोन्याची अंगठी,साडेचार ग्रॅमचे कानातील वेळ असा एकूण ७४,०८६ रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (दि.४) बुधवार रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस (Beed police) करत आहेत.  

Advertisement

Advertisement