बीड दि.३१(प्रतिनिधी): अंबाजोगाई (Ambajogai)शहरातून चोरी गेलेल्या दुचाक्या तळेगाव शिवारात विक्रीसाठी ठेवल्या असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (दि.३०) शुक्रवार रोजी कारवाई करत चोरीच्या सात दुचाक्या जप्त करत (Crime)आरोपीला अटक करण्यात आली आहे .
बीड जिल्हयामध्ये होणाऱ्या दुचाकी चोरीच्या गुन्हयामध्ये वाढ झाल्याने दुचाकी चोरीचे गुन्हे जास्तीत जास्त उघडकीस आनण्याचे सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेनेशर्थीचे प्रयत्न सुरु केले होते. (दि.३०) शुक्रवार रोजी पो.ह भागवत शेलार यांना माहीती मिळाली की,अंबाजोगाई (Ambajogai) शहरातुन चोरी गेलेल्या गाडया तळेगांव शिवारामध्ये घरामध्ये विक्रीसाठी ठेवल्या असुन त्याची डिल होणार आहे. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सिध्देश्वर मुरकुटे व पथकाने तळेगाव येथे छापा मारला असता, आरोपी शेख ईलियास शेख गफार (वय २५) रा.तळेगांव ता.जि बीड. हा चोरीच्या गाड्यांसह मिळाला.आरोपीकडुन एकुण सात दुचाकी जप्त केल्या.त्या दुचाक्या अंबाजोगाई, जालना, छत्रपती संभाजीनगर येथुन चोरल्याचे आरोपीने सांगीतले. आरोपीकडुन एकुण पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले.असा एकुण ६,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील(Beed police) कारवाई नवनित काँवत,पोलीस अधीक्षक बीड, सचिन पांडकर,अपर पोलीस अधीक्षक बीड,चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मान शेख,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड, पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, पोलीस हवालदार भागवत शेलार, विकास राठोड, दिपक खांडेकर, राहुल शिंदे, नितीन वडमारे, विकी सुरवसे, सुनिल राठोड, मच्छिद्र बीडकर यांनी केली आहे.