बीड-येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी अखेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांची वर्णी लागली आहे.पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी याबाबत आदेश जारी केलेत.उस्मान शेख यांची लातूरला बदली झाल्यानंतर अनेकांच्या नावाच्या चर्चा सुरु होत्या.अखेर एलसीबीच्या प्रमुखपदी श्री. बंटेवाड हे कारभार पाहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
उस्मान शेख यांची लोकसभा निवडणुकीनंतर एलसीबीच्या प्रमुखपदी वर्णी लागली होती.११ महिन्यांचा त्यांचा कालावधी चांगला राहिला.दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या आरोपांमध्ये त्यांचे नाव आल्याने त्यांनी विनंती बदलीची मागणी केली होती.त्यानुसार त्यांची बदली झाल्यानंतर आता शिवाजी बंटेवाड यांची एलसीबीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे.सध्याच्या परिस्थितीमध्ये कायदा व सुववस्था योग्य हाताळण्यासोबतच गुन्हेगारी रोखणे व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शांततेत पार पाडणे यासाठी नूतन एलसीबी प्रमुखांना मोठी कसरत करावी लागणार आहे.त्यांचा ग्रामीण पोलीस ठाण्यातील कार्यकाळ चांगला ही राहिला आहे.शांत, शिस्तप्रिय आणि संयमी असलेल्या अधिकाऱ्याला अखेर एलसीबीच्या खुर्चीवर पोलीस अधिक्षक यांनी संधी दिली आहे.
अश्या आहेत प्रभारीच्या बदल्या
पीआय
शिवाजी बंटेवाड-बीड एलसीबी
मारुती खेडकर-बीड ग्रामीण
किशोर पवार-शिवाजीनगर
शरद जोगदंड-अंबाजोगाई शहर
एपीआय
वर्षा शिंदे-वडवणी
महादेव ढाकणे-दिंद्रुड
मनोज निलंगेकर-तलवाडा
प्रविण जाधव-शिरूर कासार
अमोल केदार-एसपी रीडर
आदिनाथ भडके-अंभोरा