Advertisement

 भाजपा जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम 

प्रजापत्र | Saturday, 31/05/2025
बातमी शेअर करा

बीड दि.३१(प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र (Bjp)प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता उर्वरित जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा आज (दि.३१) शनिवार रोजी आ. चैनसुख संचेती यांनी पक्ष कार्यालमार्फत उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बीड जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.(Beed)बीडच्या भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांना कायम ठेवले आहे.  

 

 

Advertisement

Advertisement