Advertisement

नाना पाटेकर यांच्या मृत्यूचे कारण उलगडले

प्रजापत्र | Sunday, 11/10/2026
बातमी शेअर करा

पणजी: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामागचे नेमके कारण त्यांच्या शवविच्छेदन (पोस्ट-मॉर्टम) अहवालातून आता स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता. नाना पाटेकर यांना कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) चा त्रास होता. त्यांच्या हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी (ब्लड क्लॉट) तयार झाल्याने रक्तप्रवाह खंडित झाला आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सलग ४५ मिनिटे 'सीपीआर' (CPR) दिला, मात्र त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले नाही.

 

निधनापूर्वी मित्राला केला होता मेसेज

पोलिसांच्या तपासात त्यांच्या शेवटच्या क्षणांची माहितीही समोर आली आहे. ८ ऑक्टोबरच्या पहाटे २:३० च्या सुमारास नानांनी आपले जवळचे मित्र अमेय नाईक यांना व्हॉट्सॲपवर मेसेज करून आणि फोन करून तब्येत बिघडल्याची कल्पना दिली होती. पहाटे ३:३० वाजता हा मेसेज पाहिल्यानंतर अमेय यांनी तातडीने डोना पावला येथील नानांचे निवासस्थान गाठले. त्यावेळी नाना सोफ्यावर बेशुद्धावस्थेत आढळले. सुरक्षा रक्षकाच्या मदतीने अमेय यांनी त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल केले. मात्र, पहाटे ५:२० वाजता डॉ. शेखर सालकर यांनी त्यांना मृत घोषित केले.

 

आकस्मिक मृत्यूची नोंद आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

या दुर्दैवी घटनेनंतर, पणजी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), २०२३ च्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर गोव्याहून त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले, जिथे मध्यरात्री डोंजे गावात त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

 

Advertisement

Advertisement