Advertisement

एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत संपविले जीवन 

प्रजापत्र | Saturday, 12/09/2026
बातमी शेअर करा

बीड: आष्टी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात चालक म्हणून सेवा बजावणाऱ्या एका ४६ वर्षीय कर्मचाऱ्याने बसस्थानकातील विश्रांती कक्षात गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज, शनिवारी (दि. १२) पहाटे समोर आली आहे. अन्सार हबीब शेख (वय ४६, रा. साबलखेड, ता. आष्टी) असे मृत चालकाचे नाव आहे. बसस्थानकाच्या आवारातच कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने एसटी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सार शेख हे २०१० पासून आष्टी आगारात चालक म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. शुक्रवारी रात्री ते नेहमीप्रमाणे बसस्थानकातील चालक व वाहकांसाठी असलेल्या विश्रांती कक्षात गेले आणि त्यांनी दरवाजा आतून बंद करून घेतला. शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक-तुळजापूर मार्गावरील बसचे चालक गाडी घेऊन आष्टी बसस्थानकात आले. काही वेळ विश्रांती घेण्यासाठी ते कक्षाजवळ गेले असता दरवाजा आतून बंद अस आढळले. वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Advertisement

Advertisement