Advertisement

बीडमध्ये वेश्याव्यवसायावर कारवाई 

प्रजापत्र | Thursday, 03/09/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.३(प्रतिनिधी):शहरातील जवाहर कॉलनी परिसरातील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली.यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. रोख रक्कम, मोटारसायकल असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक माहितीनुसार, बीड शहरातील जवाहर कॉलनीतील चंपावती शाळेच्या मागील बाजूस भक्ती कन्स्ट्रक्शन रोड परिसरातील एका घरात बाहेरून महिला बोलावून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सपोनि जनाबाई सांगळे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर लेखी आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.डमी ग्राहकाच्या सहाय्याने पूर्वपंचनामा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी डमी ग्राहकाने दिलेले तीन हजार रुपये रोख,वेश्याव्यवसायासाठी वापरले जाणारे १२ निरोध तसेच महिलांची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच-२३ ए.के. ५९०९) असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली  परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे, पोनि.शितलकुमार बल्लाळ, सपोनि जनाबाई सांगळे यांच्यासह अक्षय लोंढे यांनी केली.

 

Advertisement

Advertisement