बीड दि.२९(प्रतिनिधी): मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी (Maratha Reservation) येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुग्रीव बापू शिंदे असे या आंदोलकाचे नाव असून ते केज तालुक्यातील नांदुर घाट येथील रहिवासी आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सराटी आंतरवाली येथे आजपासून उपोषण सुरू केले असून त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुग्रीव शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह सराटी अंतरवालीकडे जात होते, गेवराई जवळ त्यांचे वाहन आले असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे
बातमी शेअर करा

