बीड दि.२९(प्रतिनिधी): माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाटवडगाव शिवारात असलेल्या सोलर पॉवर प्लांटमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घुसखोरी करून लाखो रुपयांच्या केवल्स चोरून नेल्याची आणि मोठ्या प्रमाणावर साहित्याची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सोलर प्लांटचे सुमारे ७ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून माजलगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथीत्न व्यावसायिक सतीश माणिकराव बेंबळकर यांच्या मालकीच्या 'वेबळकर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड; या सोलर प्लांटमध्ये २५ जुलै रोजी रात्री पावणेचाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडच्या तारेवरून आत प्रवेश केला. चोरट्यांनी इन्व्हर्टरला जोडलेली १२७३ मीटर डीसी वाय र कापून चोरून नेली. याशिवाय प्लांटमधील डीसी केबल, अडिंग केयान, कॉपर लगा, एमसी फोर कनेक्टर, ट्रान्सफर मार्शलिंग बॉक्स आणि इन्व्हर्टर सेफ्टी बॉक्स या साहित्याची तोडफोड करून सुमारे ७ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान केले.

बातमी शेअर करा
