शिरुर कासार दि.२६(प्रतिनिधी):तालुक्यातील तागडगाव येथील एका शेतकऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील ९७ हजार रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना मंगळवार (दि.२५) रोजी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर कासार तालुक्यात मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असून याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून तागडगाव येथील शेतकरी रमेश शाहूराव सानप (वय ४९) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप, कोंडा तोडून अज्ञात चोरटे घरात घुसले आणि घरातील कपाट फोडून आतील ९७ हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना मंगळवार (दि.२५) रोजी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोह श्री.तांदळे हे करीत आहेत.
बातमी शेअर करा

