बीड दि.१४ (प्रतिनिधी)-राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आणि पोलीस दलाच्या संदर्भाने तर संशयाच्या नजरेने पाहणाऱ्या बीड जिल्ह्यातील १५ जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.यात तीन पोलीस निरीक्षक,दोन पोलीस उपनिरीक्षक,दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर आठ हवालदारांचा समावेश आहे.बीड जिल्हावासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
बीडमधील जाहीर झालेल्या उत्कृष्ट अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक असलेल्या प्रवीणकुमार बांगर,सादिक अकबर पठाण आणि मारुती खेडकर यांना सेवा पदक जाहीर झाले आहे.सध्या प्रवीणकुमार बांगर बीड जिल्ह्यात कार्यरत असून इतर दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती आहे.तर त्यापाठोपाठ पोलीस उपनिरीक्षकमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले श्रीराम रामदास खटावकर,कैलास पंढरीनाथ अन्नलदास यांचा गौरव होणार आहे.तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षकमध्ये जगदीश कचरू करांडे आणि प्रल्हाद ठावर चव्हाण यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून पोलीस हवालदारमध्ये बीड जिल्हयातील आठ जणांचा गौरव होणार आहे.यात गणेश हरिभाऊ राख,निलेश भगतसिंग ठाकूर,देविदास गिरजअप्पा जमदाडे,सुभाष नारायण मोटे,युनूस कादर बागवान,विकास विठ्ठल राठोड,अशोक अर्जुनराव दुबाले आणि गणेश विष्णू हांगे यांचा समावेश असून बीड जिल्ह्यातील १५ जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबदल पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी अभिनंदन केले आहे.

प्रजापत्र | Friday, 14/08/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
