बीड दि.१४(प्रतिनिधी): बहिरवाडी शिवारात वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करत तब्बल २५ लाख रुपयांचा हायवा आणि २५ हजार रुपयांची वाळू, असा एकूण २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने गुरुवार (दि.१३) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बहिरवाडी ता. जि. बीड येथे कारवाई करत साहिल मुक्तार तांबोळी (वय २६), रा. रामतीर्थ एमआयडीसी, बीड हा भारत बेंझ कंपनीच्या हायवामधून वाळू वाहतूक करताना पथकाच्या निदर्शनास आला.पोलिसांनी हायवा क्रमांक एमएच -२४ एडी १७०४ जप्त केला असून, त्यामध्ये पाच ब्रास वाळू अंदाजे किंमत २५ हजार रुपये तसेच हायवा आणि वाळू असा एकूण २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पथक प्रमुख पोउनि श्री.सय्यद, कुलदीप औसरमल,श्री.जगताप,श्री.सानप,श्री.ढाकणे,श्री.रणदिवे यांनी केली.

बातमी शेअर करा
