बीड दि.१२(प्रतिनिधी): शहरातील इमामपूर रोडवर मागील भांडणाची कुरापत काढत एका तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड फायरिंग केल्याची घटना बुधवार(दि.१२)रोजी समोर आली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शेख मोहम्मद साद शेख हारुण (वय २२)रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड यांच्या तक्रारीवरून सफवान खान महेबुब खान, सय्यद साद, फरदीन, अखलाख (सर्व रा. पेठ बीड) यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेऊन सलीम पेट्रोलपंप, इमामपूर रोड,बीड येथे
येत फिर्यादी व त्याच्या मित्रांना धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी आरोपी क्रमांक एकाने पिस्तुलातून फिर्यादीच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या उजव्या कानावर मारून त्यालाजखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि श्री.दराडे हे करत आहेत.

बातमी शेअर करा
