बीड दि.६(प्रतिनिधी): शाळेच्या पटांगनातच विद्यार्थीनीला सर्पदंश झाल्याने सारिका संतोष नरूटे (वय १०) रा. पाथरवाला बु. ता.गेवराई ह.मु. श्रृंगारवाडी फाटा ता. शिरूर या विद्यार्थीनीचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी बाल नंदनवन इंग्लीश स्कुल श्रृंगारवाडी फाटा येथे घडली.सर्पदंश झाल्यानंतर सदर विद्यार्थीनीला तातडीने बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा

