अमरावती : राज्यात एफडीए विभागाच्या कारवाईचा धडाका सुरू असून मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए विभागाला सुनावल्यानंतर आता सरकारी आस्थापनांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, आजच मुंबईतील मंत्रालयाच्या कँटीनची तुकाराम मुंढेंच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यानंतर, विधिमंडळातील कँटीनची देखील तपासणी करण्यात आली आहे. दुसरीकडे आता आयुक्त तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) आदेशानुसार एफडीने (FDA) आपला मोर्चा विद्यापीठांकडे वळवल्याचं दिसून येत आहे. अमरावतीमधील (Amravati) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आज एफीडने धाड टाकत कारवाई केली आहे.
विद्यापीठ आणि येतील अभियांत्रिकी विद्यालायच्या मुख्य कॅन्टीनमध्ये एफडीने तपासणीसाठी धाड टाकली असता, उपहार गृहात प्रचंड अस्वच्छता आणि अधिकृत परवानाशिवाय हे उपहा गृह सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, येथील कँटीन सील करण्यात आले आहे. अन्न औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांनी ही कारवाई केली. अमरावती विद्यापीठाची कँटीन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची कँटीन पूर्णपणे बेकादेयशीर आणि विनापरवाना असल्याने तातडीची कारवाई करत दोन्ही उपहार गृहांना विभागाकडून टाळे ठोकण्यात आले आहेत.दरम्यान, या कँटीनमधील अस्वच्छता आणि विनापरवानाच्या अनुषंगाने कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासनाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला एफडीएकडून पत्र पाठवण्यात आलं आहे.

