बीड दि.२६(प्रतिनिधी):शहरातील मोमीनपुरा,मिलत नगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर पेठ बीड पोलिसांनी कारवाई करत तीन जनावरे व गोवंशाचे मांस असा अंदाजे ६२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बीड शहरातील मोमीनपुरा,मिलत नगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर पेठ बीड पोलिसांनी रविवार (दि.२६) रोजी कारवाई करत तीन जनावरे व गोवंशाचे मांस असा अंदाजे ६२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी नदीम गफार कुरेशी (वय 38)रा. मिलत नगर, पेठ बीड यास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख,उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या आदेशाने पोनि.निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.शशिकांत मुसळे,पोउनि.साईनाथ बारगळ, पोह.नितेश माने,श्री.चांदणे, पो.अं.शहाजी बहीर, कल्याण जाधव,श्री.राठोड यांनी केली.

बातमी शेअर करा
