Advertisement

बीडमध्ये 'वंचित' च्या बंदला प्रतिसाद 

प्रजापत्र | Thursday, 23/07/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२३(प्रतिनिधी):विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमार प्रकरणाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.वंचितच्या या बंदला बीड जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला असून व्यापाऱ्यांनी शहरातील बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या आहेत.
   दिल्ली येथील जंतर मंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमार प्रकरणाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने गुरुवार (दि.२३) रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या नगर रोड,सुभाष रोडवर फेरी काढत बंदचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहेत.
  

 

Advertisement

Advertisement