Advertisement

मध्यरात्री चोरट्यांनी फोडले घर 

प्रजापत्र | Thursday, 16/07/2026
बातमी शेअर करा

 शिरूर कासार दि.१६(प्रतिनिधी):तालुक्यातील शिरापूर गात येथे घराचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १,५८,७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार (दि.१४ )रोजी रात्री घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मागील काही दिवसांपासून शिरूर कासार शहरासह तालुक्यात चोरी,घरफोडीचे प्रमाण वाढले असून याकडे पोलीस प्रसाशनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे यातून दिसत असून तालुक्यातील शिरापूर गात येथील रहीम अब्दुल शेख (वय ४४) यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने तोडून कपाटातील १० ग्रॅमचे मिनी गंठण अंदाजे किंमत ५,०००० रुपये, २ ग्रॅमचे पेंडॉल अंदाजे किंमत ७,५०० रुपये,५०० मिली ग्रॅमचे १० मनी अंदाजे किंमत १,९०० रुपये व ९,९,३०० रुपयांची नगदी रक्कम असा एकूण १,५८,७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना  मंगळवार (दि.१४) रोजी रात्री १०:३० ते बुधवार (दि.१५) रोजी रात्री ०२:३० च्या सुमारास घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास श्री.उबाळे हे करत आहेत.
 

Advertisement

Advertisement