नेकनूर दि.१६ (वार्ताहार):बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातीलअहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंभा–पाटोदा मार्गावरील मुळुकवाडीजवळ जनावरे वाहून नेणाऱ्या भरधाव पिकअपने रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या दोन शाळकरी मुलांना गुरुवारी (दि. १६) पहाटे
जोरदार धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१६ डीपी-२२४५ क्रमांकाची जनावरे वाहून नेणारी पिकअप भरधाव वेगाने जात होती. मुळुकवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअपने रस्त्याच्या कडेला व्यायाम करणाऱ्या ईश्वर गणेश ढगारे (वय १६) आणि राज बिरूदेव ढगारे (वय १६),दोघेही मुळुकवाडी येथील रहिवासी, गंभीर जखमी झाले आहेत. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा
