Advertisement

सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या 

प्रजापत्र | Saturday, 11/07/2026
बातमी शेअर करा

  बीड दि.११(प्रतिनिधी): पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. प्रशासकीय तसेच कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून बदलीने रिक्तपदे भरण्याच्या प्रक्रियेनुसार हे आदेश काढण्यात आले आहेत.
   केज पोलीस ठाण्याचे पो. नि.स्वप्नील उनवणे यांची बीड येथील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माजलगाव शहरचे पो.नि. राहुल सुर्यतळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्या बीड येथील पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पो.नि. प्रविणकुमार बांगर यांची माजलगाव शहर पोलीस ठाणे प्रभारी म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. बीड येथील सायबर पोलीस ठाण्याचे पो.नि.निलेश केळे यांची पेठ बीड पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे तर पोलीस उपअधिक्षक मुख्यालय येथील पो.नि. अशोक मुदीराज यांच्यावर बीडच्या सायबर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीड येथील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी संतोष शेजाळ यांची पोलीस उपअधिक्षक मुख्यालय प्रभारी पदी बदली करण्यात आली आहे. संबंधित सर्व सहा पोलीस निरीक्षकांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement