Advertisement

 गावठी हातभट्टीवर माजलगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई 

प्रजापत्र | Saturday, 11/07/2026
बातमी शेअर करा

माजलगाव दि.११(प्रतिनिधी):तालुक्यातील किट्टीआडगाव येथे माजलगाव ग्रामीण पोलिसांनी शुक्रवार (दि.१०)रोजी कारवाई करत गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, तयार दारू तसेच उत्पादनासाठी लागणारे साहित्य असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयित महिला  फरार झाली.
 गुप्त माहितीच्या आधारे माजलगाव ग्रामीण पोलिसांनी किट्टीआडगाव येथे छापा टाकला असता मंदाबाई उत्तम जाधव रा.किट्टीआडगाव हिच्या ताब्यात गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.कारवाईदरम्यान पोलिसांनी २०० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक ड्रममध्ये एकूण ४०० लिटर रसायन किंमत २० हजार, २०० लिटर क्षमतेच्या एका लोखंडी ड्रममध्ये २०० लिटर रसायन किंमत १०  हजार तसेच ५० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू किंमत ५ हजार रुपये असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून  पो.अं आकाश अडागळे यांच्या फिर्यादीवरून मंदाबाई उत्तम जाधव हिच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनंत्रे,पोलीस निरीक्षक श्री.रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवनाथ उबाळे, पो.अं.आकाश अडागळे,किशोर खेत्रे यांनी केली.

Advertisement

Advertisement