बीड दि.१० (प्रतिनिधी) : जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कामासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना समाजकल्याण विभागातील अधिलेखापाल राठोड अण्णासाहेब गबरू याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार (दि.१०) रोजी रंगेहात पकडले.
अधिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भातील काम करून देण्यासाठी आरोपीने ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. त्यानुसार आरोपी राठोड अण्णासाहेब गबरू याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
बातमी शेअर करा

