बीड-बालाघाटवरील जगदंबा कला केंद्रावर बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाड मारून आठ महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.नेकनूर पोलीस ठाण्यात या महिलांना आणण्यात आले असून नेकनूर पोलीस पुढील तपास करीत असल्याचे कळते.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदंडवडगाव येथे जगदंबा कला केंद्र आहे. या कला केंद्राला मान्यता नसल्याने ते मागील काही वर्षांपासून बंद होते. मात्र या केंद्रावर पुन्हा काही महिला आल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रमुख असलेल्या सांगळे यांनी धाड मारत कारवाई केली आहे. आठ महिला यावेळी आढळून आल्याची प्राथमिक माहिती असून नेकनूर पोलीस ठाण्यात सध्या महिलांना आणण्यात आले आहे. सपोनि मंगेश साळवे यांनी याबाबत तपास सुरु असून कोणताही गैरप्रकार तिथे सुरु झालेला नव्हता अशी माहिती प्रजापत्रला बोलताना दिली आहे.

बातमी शेअर करा
