Advertisement

एकाचवेळी तीन लाचखोर पकडले

प्रजापत्र | Tuesday, 30/06/2026
बातमी शेअर करा

बीड दि.३०(प्रतिनिधी): जिल्ह्यात लाचखोरीने आता कहरच केला आहे. कोणतेही काम पैशाचे वजन ठेवल्याशिवाय होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार (दि.३०) रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच कारवाईत सहकार विभागातील तीन लाचखोरांना रंगेहात पकडले.
   सावकारी परवाना देण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर १३ हजार रुपये स्वीकारताना सहायक निबंधक सूरज जगदाळे, कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने आणि खाजगी इसम महेश फपाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. माजलगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात हा ट्रॅप करण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

Advertisement