बीड दि.२५(प्रतिनिधी): पाटोदा तालुक्यात घरफोडी,कोयत्याने वार करुन जबरी चोरी करणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने बुधवार (दि.२४)रोजी रात्री जेरबंद केले.त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य,मुद्देमाल जप्त करत दोन गुन्हे उघड केले आहेत.
पाटोदा तालुक्यातील थेरला येथील राजेंद्र अभिमान नागरे (वय ४१) बीड वरुन गावी थेरलायेथे दुचाकीवरुन जात असतांना सोमवार (दि.२२) रोजी रात्री ०७.३० वा रोहतवाडी शिवारामध्ये तीन अनोळखी इसमांनी दुचाकी आडवुन त्यांच्या खिशातील मोबाइल व नगदी पैसे काढुन घेतले व त्यांना कोयत्याने वार केले यात राजेंद्र नागरे हे गंभीर जखमी झाले. तसेच थेरला फाटा येथे राहत असलेल्या सिताबाई महादेव सोनवणे रा.थेरला ता. पाटोदा येथील घर व चहापान्याचे हॉटेल संतकृपा येथे चोरी करुन घरातील टी.व्ही., मोबाईल व सोन्या चांदीच्या वस्तु असा एकुण ८५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला माहिती मिळाली कि,दोन्ही गुन्ह्यातील आरोपी इंदापुर जि. पुणे येथे असल्याची माहिती मिळाली असता सदरील ठिकाणी जात माऊली नामदेव पवार (वय २६) मयुर ऊर्फ ओमकार नितीन भोसले (वय २२),आदित्य ऊर्फ बाळा सिद्ध पवार (वय १९),वर्षे सर्व रा. इंदापुर ता. इंदापुर जि.पुणे या तिघांना ताब्यात घेत चोरी केलेला मोबाईल, रोख रक्कम व टी.व्ही. तसेच सोन्याच्या मौल्यवान वस्तु व गुन्ह्यात वापरलेला कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याकडून दोन गुन्हे उघड केले.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह.अशोक दुबाले,सोमनाथ गायकवाड,बाळु सानप,अर्जुन यादव,राहुल शिंदे,अशफाक सय्यद,मनोज परजणे,अश्वीन सुरवसे नितीन वडमारे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
