बीड दि.२२(प्रतिनिधी):तालुक्यातील बीड-शिरूर-पाथर्डी मार्गावरील कृषी कॉलेज जवळ हायवा आणि अशोक लेलँड पिकपचा भीषण अपघात झाल्याची घटना दुपारी ४ च्या सुमारास घडली असून यात एक जण ठार झाल्याची माहिती आहे.
बीड-पाथर्डी मार्गावर नवगण राजुरी पासून काही अंतरावर असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या वळणावर हायवा व अशोक लेलँड या गाडीची सोमवार (दि.२२) रोजी दुपारी ४ च्या सुमारास समोरासमोर धडक झाली यामध्ये अशोक लेलँड मधील चालक जागीच ठार झाला तर एक जण यामध्ये गंभीर झाले असल्याची धक्कादायक घटना काही घडली आहे. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी येथे प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे दोन्हीही तरुण कोल्हारवाडी येथील असल्याची माहिती समोर येत आहे.यामधील चालक पप्पू वीर हा मयत असून सुनील धर्मे हा गंभीर जखमी झाला आहे.
बातमी शेअर करा

