Advertisement

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी धक्कादायक निकाल

प्रजापत्र | Saturday, 20/06/2026
बातमी शेअर करा

मुंबई: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी न्यायालयाने आज निकाल दिला आहे. तब्बल २० वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. तसेच काही कारणांमुळे निकाल देण्यास विलंब झाला. मात्र, लोकनेत्याची हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कळंबोली पोलिसांकडे होता. त्यानंतर तो नवी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मात्र, या तपासावर पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले.

Advertisement

Advertisement