नेकनुर दि.१६(वार्ताहार) : नेकनुर जवळ स्कॉर्पिओ आणि पिकअपच्या अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी बीडच्या रुग्णालयात हलवले आहे.
बीड तालुक्यातील नेकनुर येथील कालिका मंगल कार्यालयासमोर स्कॉर्पिओ आणि पिकअपचा मंगळवार (दि.१६)रोजी दुपारी १:३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून स्कॉर्पिओ क्रमांक एमएच २३ एडी २९८७ याने पिकअपला समोरासमोर जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करून नंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बातमी शेअर करा

